केमच्या विकासासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या कडून २ कोटी ४५ लाख रूपयाचा निधी मंजूर
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम गावच्या विकासासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यानी २ कोटी ४५ लाख रूपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी सरपंच मोहिते गटाचे युवा नेते अजितदादा तळेकर यांनी दिली.
- एकूण निधी खालील कामांसाठी दिला आहे.
- श्री ऊत्तरेश्वर देवस्थान विकासकामांसाठी – २ कोटी
- नागोबा मंदिर ते श्री ऊत्तरेश्वर देवस्थान रस्ता काॅंक्रिट करण करणे – २० लाख
- गणपती मंदिराजवळील दौड वस्ती येथे व्यायाम शाळा बांधणे – १० लाख
- धर्मवीर संभाजी चौक ते विकास नगर पाण्याची टाकी खडीकरण रस्ता साठी – १५ लाख
श्री ऊत्तरेश्वर देवस्थान साठी देण्यात येणाऱ्या दोन कोटी निधी मध्ये भाविकांसाठी भक्त निवास, मंदिर परिसरात काँक्रीट करण, पेव्हर ब्लॉक वाॅल कंपाऊंड वाहन तळ पिण्याच्या पाण्याची सोय स्ट्रीट लाइट बसविणे आदि कामे होणार आहेत.
या वेळी सरपंच आकाश भोसले उपसरपंच नागनाथ तळेकर, सदस्य अनता तळेकर राहुल कोरे बाळू अवघडे, सोमा यादव, नामदेव गाडे, रमेश पवार सचिन बिचितकर नामदेव तळेकर प्रकाश तळेकर आदि उपस्थित होते.