विनाअडथळा दहिगावचे आवर्तन चालू राहण्याची केली तजवीज - पूर्व भागातील शेतकऱ्यांचे भविष्य समृद्ध - आमदार शिंदे -

विनाअडथळा दहिगावचे आवर्तन चालू राहण्याची केली तजवीज – पूर्व भागातील शेतकऱ्यांचे भविष्य समृद्ध – आमदार शिंदे

0

करमाळा (दि.१३) – करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी  असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना आपण पूर्ण क्षमतेने चालविणार असून आवर्तन कालावधीमध्ये एखादा पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावरती  होतो. त्यामुळे दहिगाव टप्पा १ येथे अधिकचा १ पंप व कुंभेज टप्पा २ येथे अधिकचा १ पंप असे  २ पंप आपण जास्तीचे बसविणार असून त्यामुळे एखादा इलेक्ट्रिक पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावरती होणार नाही, योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील. परिणामी शेतकऱ्यांची बारमाही पिके चांगली येतील. दहिगाव उपसाच्या पट्ट्यातील गावांमध्ये शेतकरी ऊसाबरोबरच केळी या पिकाकडे वळलेले आहेत. आज कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न ते काढत आहे ही समाधानाची बाब आहे. इथून पुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारे पाणी आपण त्यांना पूर्ण क्षमतेने बंद नलिका वितरण प्रमाणे उपलब्ध करून देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चितच समृद्धी येईल आणि ही समृद्धी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचे भविष्य निश्चितच बदलवेल असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी  फिसरे येथील जाहीर सभेप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर विलास दादा पाटील, ,तानाजी बापू झोळ, मनसे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप, गणेश भाऊ चिवटे, हनुमंत मांढरे पाटील, भरत अवताडे, अमोल महाराज काळदाते ,गौतम ढाणे, राजेंद्र बाबर,  सूर्यकांत पाटील, अजित विघ्ने,दत्ता अडसूळ, विवेक येवले, मानसिंग खंडागळे,  राहुल कुकडे ,सचिन वीर, फिसरे गावातील प्रदीप दौंडे, संदीप नेटके उपस्थित होते.

याप्रसंगी हनुमंत मांढरे पाटील,अमोल महाराज काळदाते ,विलास दादा पाटील, विवेक येवले, राजेंद्र बाबर ,गौतम ढाणे ,अजित विघ्ने , डॉ. विकास वीर, चंद्रकांत सरडे यांनी मनोगते व्यक्त केली.आभार भरत अवताडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!