करमाळ्यात उद्या आमदार शिंदे यांची पदयात्रा व सभा आयोजित
करमाळा (दि.१७) – विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजयमामा शिंदे यांची उद्या सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी करमाळा शहरात भव्य पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात होणार असून सुभाष चौकामध्ये शेवट होणार आहे. सुभाष चौकामध्ये दुपारी दोन ते पाच या वेळेत जाहीर सभा होणार आहेत.