निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पांडे गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढविणार – लक्ष्मी सरवदे

करमाळा: निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण यंदाची जिल्हा परिषदेची निवडणूक पांडे गटातून लढणार असल्याची माहिती घारगावच्या माजी सरपंच व ग्रामरत्न सरपंच पुरस्कार विजेत्या लक्ष्मी संजय सरवदे यांनी माध्यमांना दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले आहे. करमाळा तालुक्यातील सहा पैकी पाच जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे, पांडे जिल्हा परिषद गट हा सर्वसामान्य महिलांसाठी खुला राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर पांडे गटातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सौ. सरवदे यांनी सांगितले.

अधिक बोलताना सरवदे म्हणाले की, याच गटात घारगाव हे माझे गाव व माहेर असून, मला कुठली ही राजकीय पार्श्वभूमी नाही. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असुन, आंदोलने, निवेदने यातून अनेक नागरीकांना न्याय मिळवून दिलेला आहे. माझी लढाई ही प्रस्थापित लोकांच्या घराणेशाहीच्या विरोधात असुन, पुर्ण ताकदीने ही जिल्हा परिषद निवडणुक लढविणार आहे.





 
                       
                      