आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्यावतीने 'भगवा सप्ताह' उपक्रमाचे आयोजन -

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्यावतीने ‘भगवा सप्ताह’ उपक्रमाचे आयोजन

0

केम (संजय जाधव): युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका युवासेनेच्यावतीने ‘भगवा सप्ताह’ उपक्रमाला आज कमलाभवानी मातेस महाआरती करून औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आशाताई टोंपे, उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे, संजय शिंदे, शहरप्रमुख प्रविण कटारिया, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपशहरप्रमुख पंकज परदेशी, संतोष गानबोटे

महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, युवासेना शहर प्रमुख समीर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, बालाजी वाडेकर, भाऊ मस्तूद, मयुर यादव, विशाल नवगन, ज्ञानदेव लोंढे, शहाजीराव धेंडे, मयुर तावरे, योगेश नगरे, पै. तुषार सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भगवा सप्ताह’ अंतर्गत खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत:

  • १६ जून: हिवरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
  • १७ जून: मिरगव्हाण येथील लावंड वस्ती शाळेत शालेय साहित्य वाटप
  • १८ जून: हिवरे येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या हस्ते
  • १९ जून: मातोश्री अनाथ आश्रम येथे अन्नदान
  • २१ जून: निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप
  • २६ जून रोजी :  युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे व उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील दत्त मंदिर (सरकारी रुग्णालयासमोर) येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व कार्यक्रमांना शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!