पोथरे गावाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू -  प्रा.रामदास झोळ - Saptahik Sandesh

पोथरे गावाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू –  प्रा.रामदास झोळ

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पोथरे (ता.करमाळा) येथील शनैश्वर देवस्थान येथील ग्रामस्थ, भाविकांना बसण्यासाठी बाकडे मंदिर सुशोभीकरण निसर्गरम्य परिसर करण्यासाठी वृक्षारोपण प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने काल (दि.१६) करण्यात आले. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

शनैश्वर देवस्थान ट्रस्ट पोथरे ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक रामदास झोळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना  प्रा.रामदास झोळ म्हणाले की  करमाळा तालुक्यातील शनैश्वर देवस्थान प्राचीन  पुरातन जागृत देवस्थान असून शनैश्वराची पूर्णाकृती मूर्ती असलेले भारत देशातील एकमेव ठिकाण आहे. शनैश्वर देवस्थानच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातुन निधी मिळवुन देण्यासाठी लोकसहभागातून पोथरे गावाचे प्रश्न मार्गी लावून लावण्यासाठी प्रयत्न करू असे मत  प्रा.रामदास झोळ यांनी व्यक्त केले. शनेश्वर देवस्थान पोथरे मंदिर परिसरातील नागरिकांना व भाविकांना अल्हाददायक वातावरण निर्मितीसाठी निसर्गाचे सानिध्य लाभाण्यासाठी परिसरात 28 वृक्षांची लागवड वृक्षरोपण करून प्राध्यापक रामदास झोळ व मान्यवरांच्या हस्ते झाडांचे  वृक्षारोपण करण्यात आले. तसेच 27 जाळ्याचे ट्री गार्ड देण्यात आले. भाविक भक्तांसाठी नागरिकांसाठी विसाव्यासाठी बसण्यासाठी पाच बाकडे देण्यात आले.

या कार्यक्रमास आदिनाथचे मा.संचालक एकनाथ झिंजाडे खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन प्रभाकर शिंदे,मा.सभापती किसन आण्णा शिंदे,दादासाहेब झिंजाडे,मकाईचे मा.संचालक हरिभाऊ झिंजाडे,जेष्ठ नागरिक प्रेमराज शिंदे, पोलीस पाटील संदीप शिंदे पाटील, शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आजिनाथ कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे ,जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे ग्रामपंचायत सदस्य संतोष ठोंबरे, तानाजी देशमुख ,सुधीर साळुंखे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा अध्यक्ष अमोल घुमरे गोपीनाथ पाटील, सोमनाथ आबासाहेब झिंजाडे, विशाल शिंदे, राज झिंजाडे, अक्षय जाधव, अमोल रोही, हरिभाऊ आढाव, अजित गोसावी, लक्ष्मण शिंदे ,बबन जाधव, तुकाराम नायकुडे संतोष ठोंबरे, बाळू कुलकर्णी, बबन शिंदे, सुभाष शिंदे ,आजिनाथ झिंजाडे अरुण झिंजाडे ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!