भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी रेवननाथ फरतडे यांची नियुक्ती

केम (संजय जाधव):भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा करमाळा तालुकाध्यक्ष पदी रेवननाथ फरतडे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनंसिंह केदार, तालुका अध्यक्ष सचिन पिसाळ यांच्या मान्यतेने झाली.

नवीन जबाबदारी आणि पदाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत, तसेच समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम येत्या काळात करणार असल्याचे फरतडे यांनी सांगितले.
या निवडीनंतर त्यांना अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.




