आ.रोहित पवार व मा. आ. नारायण पाटील यांचा कार्यकर्ता स्नेह मेळावा पुण्यात संपन्न -

आ.रोहित पवार व मा. आ. नारायण पाटील यांचा कार्यकर्ता स्नेह मेळावा पुण्यात संपन्न

0

करमाळा (दि.२३) नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हडपसर, कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेल्या कर्जत, जामखेड आणि करमाळा भागातील नागरिकांचा काल (दि.२२) कोंढवा (पुणे) इथं ‘कार्यकर्ता स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थित राहून माजी आमदार नारायण पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. या मेळाव्याला  पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सौ.शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, विश्वराज वाघमोडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील म्हणाले कि करमाळा तालुक्यातील कामानिमित्त पुणे मुंबई सारख्या स्थलांतरित झालेल्या नागरिकांना भविष्यात अशी वेळ येणार नाही यासाठी गावाकडील त्यांच्या शेतीला उजनीतून पाणी आणि वीज या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एक संधी हवी आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे भारतातील शेतकऱ्याच्या विकासासाठी असलेले योगदान व या प्रदीर्घ अनुभवातून निर्माण झालेले त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनात खूप काही शिकवून जातात. यामुळे अशा मेळाव्यातून प्रेरणा घेऊन आपण करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटत राहणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली. करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असून जन्म भूमिशी असलेलं तुमचं नातं मला राजकीय जीवनात प्रेरणा देऊन जात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आमदार रोहित पवार यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गंगाधर बढे, दीपक शिंदे, डॉ गणेश राख, सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे,शेखर गाडे, दीपक देशमुख, नंदकुमार शेळके, संतोष वारे, बलभीम धर्मावत, डॉ मधूकर खेतमालस, संजय मासाळ, वंदना पाटील, सुरेश कवडे, सुरेश वारकड, बाळासाहेब गायकवाड, शिवडीप उनदरे, बाळासाहेब वाघमोडे, विकास शिंदे, विकी दिवकते, किरण निकतं, श्रीमंत शेळके, विक्रम कोपनर, सोमनाथ राख, रामदास बापू राख, अंगद रुपनवर, जयसिंग शिंदे, विक्रम खपसे, बाबुराव अडसूल, सुनील हुलगे, शिवराज पालवे, हनुमंत धालगडे, राहुल गोडगे, आदी मान्यवार उपस्थित होते.

या कार्यकर्ता मेळाव्यास पुणे शहर व परिसरातील करमाळा, कर्जत जामखेड या मतदार संघाती निगडित शेकडो कार्यकर्यांनी उपस्थिती दर्शविली होती. मान्यवारांचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजक तात्यासाहेब वाघमोडे, विकी देवकते आणि विनोद केकाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!