भाजप ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती सदाशिव राऊत यांची निवड

केम(संजय जाधव): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा करमाळा ग्रामीण मंडळ सरचिटणीसपदी रामदास सदाशिव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा व उपाध्यक्षा रश्मी बागल, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष चैतनसिंह केदार व तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ यांच्या मान्यतेने झाली.

या वेळी मकाईचे संचालक महेश तळेकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, मंडळाचे उपाध्यक्ष विजय ओहोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर रामदास राऊत म्हणाले की, “माझ्यावर सोपवलेल्या या जबाबदारीतून पक्षाची भूमिका समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे.”

या नियुक्तीनंतर पाथर्डीचे सरपंच सदाशिव तोडेकर, उपसरपंच प्रकाश खरात, राजाभाऊ कोरे, ऋषिकेश शिंदे, राजेंद्र कोरे, समाधान कोरे, बंडू कोरे, शंकर तोडेकर, अशोक खरात व शशिकांत खरात यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.




