केम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सारिका कोरे
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्याचे लक्ष लागलेल्या केम ग्रामपंचायत सरपंच पदी शिवसंभो ग्रामविकास पॅनल मोहिते-पाटील गटाच्या सौ सारिका कोरे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनलच्या सौ मनीषा देवकर यांचा २३८ मतानी पराभव केला सारिका कोरे यांना २८८८ तर मनिषा देवकर २६५० मते मिळाली. श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनलचे १० सदस्य निवडून आले तर मोहिते-पाटील गटाला ७ जागेवर समाधान मानावे लागले. श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनल साठी सरपंच पद हुकले असल्याने गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.
- शिवसंभो ग्रामविकास पॅनल विजयी उमेदवार
- अजितदादा तळेकर (६३२)
- सौ अनुराधा भोसले (६१३)
- सौ संगिता तळेकर (५८४)
- नागनाथ तळेकर (६६४)
- नामदेव तळेकर (५८७)
- सौ पुष्पा शिंदे (५४७)
- आजीनाथ देवकर (४५६)
- श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार.
- गोरख पारखे (६५८)
- ऋतुजा ओहोळ (६१५)
- वंदना तळेकर (६२६)
- सागर कुरडे (५७७)
- अलका गोडसे (५४१)
- विजयसिंह ओहोळ ५५४)
- अनिता वायभासे (३९२)
- अन्वर मुलाणी (३९६)
- दत्तात्रय बिचितकर (३७६)
- कमल अवघडे (५३८)
या निवडणुकीत करमाळा तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे यांच्या पत्नी भाग्यश्री गाडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता उपसरपंच कोण होणार या कडे लक्ष लागले आहे.
- सरपंच पदाच्या निवडणुकीत चिखलठाण, घोटी, रावगाव, कंदर येथे बदल तर जेऊर, केम येथे प्रस्थापितांची पुन्हा सत्ता – प्रत्येक गटाचे सरपंच पदावर वेगवेगळे दावे
- सिंह आला पण गड गेला