शेटफळच्या सरपंच, उपसरपंचांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश - Saptahik Sandesh

शेटफळच्या सरपंच, उपसरपंचांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील शेटफळ (नागोबाचे) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात आज रविवारी (दि.३) जाहीर प्रवेश केला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (तालुका माढा) येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

यामध्ये सरपंच विकास गुंड, उपसरपंच शिवाजी पोळ नागनाथ दूध संस्थेचे चेअरमन मनोहर पोळ, व्हाईस चेअरमन विकास पोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पोळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य , सोसायटीचे सदस्य यांचेसह अनेक ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी सरपंच, उपसरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांना फेटा बांधून, हार श्रीफळ देत सत्कार करत शिंदे गटात स्वागत केले.

ज्या विश्वासाने शेटफळ येथील पदाधिकाऱ्यांनी माझ्या गटात प्रवेश केला आहे, त्याच विश्वासाने मी शेटफळ गावातील विकास कामे करण्यास नेहमीच तत्पर असेल. तसेच प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न सुद्धा सोडविण्यास मी कटिबद्ध असेल.

आमदार संजयमामा शिंदे

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, वाशींबेचे सरपंच तानाजी झोळ , शिवव्याख्याते हर्षल बागल , संचालक धनंजय मोरे , विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख , सुरज ढेरे , माजी उपसरपंच भारत पाटील , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे , गुलाब पोळ , माजी उपसरपंच युवराज नाईकनवरे , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे , दत्तात्रय पाटील , बापुराव गुंड , सतीश पोळ , रणजीत लबडे , नवनाथ पोळ , सुधीर पोळ , नागनाथ जाधव , महादेव गुंड , सोसायटी सदस्य तुकाराम गुंड , विशाल पोळ , तुकाराम चोरगे , सचिन पोळ , संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सुहास पोळ , अमोल पोळ , राहुल लबडे , महारुद्र पोळ , ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब गुंड , राजेंद्र पोळ , जिवराज पोळ , सोमनाथ गुंड , किरण पोळ , देविदास पवार , नाना नाईकनवरे , अद्युम गुंड , उमेश घोगरे , धनाजी गायकवाड , राहुल शिंदे , प्रदीप पोळ , आशिष गुंड , पोपट पोळ , रवींद्र पोळ , बाबुराव गुंड , नागनाथ पोळ , नितीन धेंडे , अजिंक्य गुंड , अरुण नवले , नानासाहेब कळसाईत , समाधान गुंड , रामभाऊ पोळ , सचिन पोळ , नागनाथ जाधव , सुधीर पोळ , सोमनाथ गुंड , बापूराव गुंड , विशाल पोळ , रवींद्र पोळ , विठ्ठल गुंड , बाबुराव गुंड , महारुद्र पोळ , सचिन पोळ , अरुण नवले , अर्जुन नाईकनवरे यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!