मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या करमाळ्यासह सहा ठिकाणी होणार सभा – वेळापत्रक जाहीर
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांमध्ये सभा होणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
पहिली सभा दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मोडलिंब येथे मार्केट कमिटी समोरील ग्राउंड वर होणार आहे.
दुसरी सभा दि. 26 एप्रिल रोजी करमाळा येथे सकाळी दहा वाजता मार्केट कमिटी समोरील ग्राउंड सभा होणार आहे. तसेच त्याच दिवशी तिसरी सभा 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता सांगोला येथे , चौथी सभा 27 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दहिवडी येथे, पाचवी सभा 30 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फलटण येथे तर सहावी सभा दोन मे रोजी अकलूज येथे सकाळी १० वाजता शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेतून शरद पवार आपल्या भाषणातुन काय सांगणार आहेत याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
आज दिनांक 22 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा कार्यकर्त्यांसह करमाळा तालुका दौरा असून त्याचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.