करमाळा बाजार समितीच्या संचालकपदी मनिषा देवकर यांची निवड

केम (संजय जाधव) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त जागेवर येथील सौ मनीषा बाळासाहेब देवकर यांची निवड करण्यात आली २७ डिसेंबर रोजी करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकित बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी हा निर्णय घेतला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला सदस्या साधना पवार यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. शुक्रवारी (दि.२७) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित या रिक्त जागेवर सौ मनीषा बाळासाहैब देवकर यांची निवड करण्यात आली या वेळी सहाय्क निबंधक (सहकारी संस्था) अर्पणा यादव उपसभापती शैलजा मेहर, संचालक शंभुराजे जगताप नवनाथ झोळ, सागर दौड, तात्यासाहेब शिंदे रामदास गुंडगिरे, बाळासाहेब पवार, कुलदिप पाटिल, काशीनाथ काकडे, मनोज पितळे, परेश दोशी, वालचंद रोडगे, शिवाजी राखुंडे, जनार्थधन नलवडे, महादेव कामटे, नागनाथ लकडे, तसेच केम येथील दयानंद तळेकर गोरख नाना तळेकर, विलास बिचितकर, बाळासाहेब देवकर दत्तात्रय बिचितकर, शरद वायभासे आदि उपस्थित होते. या निवडीचे केम येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केम गावाला दोन संचालक दिले. त्यामुळे केम व परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन.
● सौ.मनीषा देवकर, नूतन संचालक, केम




