श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी वेणूबाई पवार यांची निवड
करमाळा(दि.१८) : श्री देवीचामाळ ग्रामपंचायतीवर माजी जयवंतराव जगताप जगताप गटाचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी वेणूबाई संतोष पवार व उपसरपंचपदी सचिन दिलीप शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
श्री देवीचा माळ ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक आज ग्रामपंचायतमध्ये पार पडली. यावेळी निवडणुकीच्या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य अमोल हनुमंत
चव्हाण, दीपक अशोक थोरबोले, बाळासाहेब वसंतराव सोरटे उपस्थितहोते.
सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीच्या वेळी अभिमान दशरथ पवार, अशोक हनुमंत चव्हाण, ओंकार प्रभाकर चव्हाण, गुरुदत्त भाऊसाहेब चव्हाण, सुशांत बंकट पवार, सचिन गोपाळ चव्हाण, अजय अभिमान पवार, प्रतीक सचिन चव्हाण, महिंद्र अनभुले, सुशांत पवारव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.