स्व. दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त १३ मार्चला करमाळ्यात भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करणार – दिग्विजय बागल
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : येत्या १३ मार्च रोजी करमाळा तालुक्याचे माजी आमदार , माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्ताने करमाळा येथे भव्य कृषी प्रदर्शन घेणार असल्याची माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली.
यासंदर्भात दिग्विजय बागल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्व. दिगंबरराव बागल मामांच्या ६८ व्या जयंतीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील एक भव्य असे कृषी प्रदर्शन बागल गटाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे ज्यात तीनशेहून अधिक कृषी विषयक स्टॉल लावणे जाणार आहेत. यामध्ये विविध बी-बियाणे, खते,अवजारे,शेतीतील नवीन तंत्रज्ञान आदी गोष्टी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे, अभ्यास करायला मिळणार आहे. यात बचतगटांना देखील स्टॉल लावायला मिळणार आहेत. या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले.
“मामांच्या आठवणी” या दालनाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे : या कृषी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर “मामांच्या आठवणी” असे दालन उभे केले जाणार आहे. यामध्ये दिगंबरराव बागल मामांच्या आठवणीला आम्ही उजाळा देणार आहोत. यामध्ये मामांच्या विविध आठवणी आम्ही गोळा करून प्रदर्शित करणार आहोत त्यासाठी ज्या ज्या लोकांकडे बागल मामांच्या आठवणी असतील जसे की मामा आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्या गावात, घरी आले असतील, लग्नासाठी,कुठल्या उद्घाटनासाठी, वास्तू शांती साठी इ. आठवणी फोटो अथवा व्हिडीओ रुपात तुमच्याकडे असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या अथवा बागल ऑफिसला आणून द्या. फोटो कोपी स्कॅन करून परत केल्या जातील. या मोहिमेत सर्वांनी राजकारण विरहित राहून मामांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले आहे.
करमाळा तालुक्यातील घडामोडी पाहण्यासाठी इन्स्टाग्रामवरील आमचे पेज फॉलो करा.