केम येथे विद्यार्थ्यांनी केली मतदान विषयी जनजागृती
केम (संजय जाधव) – श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी एन.एस.एस. विभागाच्या वतीने मतदान जनजागृती अभियान व प्रभात फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी श्री आर.बी.आदलिंगे, तलाठी, केम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाविषयी व लोकशाहीविषयी जनजागृती व्हावी व प्रत्यक्ष मतदानातील टक्का वाढावा यासाठी SVEEP या कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये मतदान जागृतीच्या वेगवेगळ्या घोषणा दिल्या. यावेळी प्रा.एस.के.पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मतदान शपथ दिली. विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीचा एक अविभाज्य घटक असलेल्या या मतदान प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमधील एन.एस.एस. विभागातील विद्यार्थी या विशेष अभियानात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.एस.के. पाटील, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले.