‘प्रहार’ च्या माध्यमातून केममधील लहानग्याची हृदयाची मोफत शस्त्रक्रिया – कुटुंबाने मानले आभार

केम (प्रतिनिधी/संजय जाधव)-केम (ता. करमाळा) येथील गरीब वडार समाजातील किशोर ज्ञानेश्वर धोत्रे यांच्या लहान बाळाच्या हृदयाला छेद असल्याचे समजताच कुटुंबावर संपूर्ण आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती झाली. खरंतर घरची परिस्थिती अतिशय बिकट गरिबीची आणि अशा परिस्थितीत २ ते ३ लाख रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता. यावेळी प्रहार करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर पवार यांच्या माध्यमातून तात्काळ मदतीसाठी आव्हान करण्यात आले. यावेळी आमदार बच्चू कडू व त्यांच्या टीमकडून प्रतिसाद मिळाला अन पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलला या बाळाची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली.


अशा प्रकारे लहानग्या बाळाला जीवदान मिळाले आहे.
यामध्ये सागर पवार यांना प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, गौरव जाधव नयन पुजारी,अमोल मानकर आदींनी सहकार्य केले. या प्रकारानंतर केम मधील नागरिकांनी प्रहार संघटनेचे कौतुक केले आहे. तसेच धोत्रे कुटुंबाकडून आमदार बच्चू कडू व प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
