घारगाव हद्दीत असलेला शासकीय पाझर तलाव शासकीय कागदा पत्रातून गायब - Saptahik Sandesh

घारगाव हद्दीत असलेला शासकीय पाझर तलाव शासकीय कागदा पत्रातून गायब

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – घारगाव (ता. करमाळा) येथे आधी मंजूर असलेला पाझर तलाव आता शासकीय कागद पत्रातून गायब झाला असल्याची माहिती, घारगाव येथील संजय सरवदे यांनी साप्ताहिक संदेशला दिली. श्री.सरवदे हे घारगावच्या सरपंच सौ.लक्ष्मी सरवदे यांचे पती आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, घारगावच्या पश्चिमेस असलेला पाझर तलाव हा पाटबंधारे उपविभाग करमाळा यांच्याकडून माननीय जिल्हा जलसंधारण अधिकारी,मृदू व जलसंधारण विभाग सोलापूर अंतर्गत पाटबंधारे उपविभाग मोडनिंब यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. असे मला पत्र जावक क्र./पा .त/११३ /सन २०२३ दिनांक २२/२/२०२३ रोजी दिले आहे आणि त्यानंतर मी उपविभागीय मोडलिंब यांच्या कार्यालयाकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये चौकशी केली असता मोडनिंब ऑफिसने माहिती अधिकाराखाली मला जावक पत्र क्रमांक/ वलि/२५३/सन२०२३ दिनांक २५ /७/२०२३ ला जे पत्र दिले आहे. त्यात त्यांनी मला असे सांगितले की सदर पाझर तलावाची क्षेत्रीय पाहणी केली असता व या कार्यालयाच्या अभिलेख कागद पत्रानुसार तपासले असता सदर पाझर तलाव या कार्यालया अंतर्गत झालेला नाही. आमच्याकडे कुठेही नोंद नाही.

पाटबंधारे उपविभाग करमाळा यांचे पत्र
माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती
घारगाव पाझर तलावा विषयीच्या निविदेची जाहिरात

जिल्हा जलसंधारण अधिकारी,मृदू व जलसंधारण विभाग सोलापूर अंतर्गत पाटबंधारे उपविभाग मोडनिंब यांच्याकडे या पाझर तलावाची जर नोंदच नाही तर माझा हा प्रश्न आहे की, घारगाव कामांतर्गत ही निविदा 2022 /2023 कशी काय मागितली आहे? याचा अर्थ घारगाव हद्दीतील पाझर तलाव हा शासकीय कागदपत्रामधून गायब झालेला आहे असे म्हणता येईल.

याबरोबरच त्यांनी सदर शासकीय पाजर तलावामध्ये अनधिकृतपणे खोदलेल्या विहिरीवर कारवाई करावी अन्यथा मला मृदू व जलसंधारण विभाग सोलापूर, मृदू व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दाद मागावी लागेल अन्यथा रस्ता रोको किंवा आमरण उपोषण केले जाईल असा इशारा त्यांनी जलसंधारण विभागाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!