‘विधवा महिला सन्मान कायदा’ करणार – महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात केला उल्लेख

करमाळा (दि.११) – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आल्यास ‘विधवा महिला सन्मान कायदा’ लागू करणार असल्याचा उल्लेख महाविकास आघाडीने आपल्या यंदाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये केला आहे. या गोष्टीचे विधवा महिला सन्मान अभियानाचे प्रणेते करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी स्वागत केले आहे.
महाविकास आघाडीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये पान नंबर 43 वर, विधवांना न्याय्य व सन्मानकारक वागणूक मिळण्यासाठी पावले उचलणार. विधवा झाल्यानंतर त्यांना अनिष्ट प्रथा पाळण्यासाठी बळजबरी होणाऱ्या घटना रोखण्यासाठी कायदा करणार असा उल्लेख केला आहे.
प्रमोद झिंजाडे, राजमाला बुट्टेपाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करावा अशी त्यांनी विनंती केली होती त्यांच्या या मागणीला यश आले आहे.




