स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  स्वबळावर लढवणार - Saptahik Sandesh

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  स्वबळावर लढवणार

करमाळा(दि.१८) : आगामी होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, आदिनाथ कारखाना या सर्व निवडणुका करमाळा तालुक्यातील संजयमामा शिंदे गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर स्वबळावर लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिवराज जगताप यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे द्वारे दिली.

यामध्ये ते म्हणाले की, नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत यावेळी विधानसभेचे निर्णायक मतदान पाहता करमाळा तालुक्यातील नागरिकांनी संजय मामा यांना अपक्ष असताना देखील निर्णयक आघाडी दिलेली आहे यातूनच असे कळते की होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती गण गटामध्ये निश्चितच संजय मामा शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषदेला बहुमत मिळवण्यासाठी निश्चितच जनता संजय मामाच्या पाठीशी आहे.

तसेच विकास कामाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार तसेच राज्यातील सत्ता केंद्रातील सत्ता यामुळे नगरपालिका असो पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामे केवळ मामाच करू शकतात आणि तालुक्यातील जनतेला आता विकास कामे होणे महत्त्वाचे आहे. यामुळे नगरपालिका असो या जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये जनता निश्चितपणे मामाच्या पाठीशी उभी राहणार आहे यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुका संजय मामा गट स्वबळावर लढणार असून त्यामध्ये निश्चितच विजय मिळवणार आहे असे मत श्री जगताप यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!