सालसे जि.प शाळेच्या 'शाळा व्यवस्थापन समिती' ची निवड प्रकिया संपन्न - Saptahik Sandesh

सालसे जि.प शाळेच्या ‘शाळा व्यवस्थापन समिती’ ची निवड प्रकिया संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) ‌- करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालसे शाळेच्या ‘शाळा व्यवस्थापन समिती’ ची निवड प्रकिया नुकतीच संपन्न झाली आहे. या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश पाटील यांची तर उपाध्यक्षपदी तहसीन मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याबरोबरच खालील सदस्यांची निवड करण्यात आली नागेश ओहोळ, शरद काळे, सोनाली कोळी, नवनाथ पवार, रेखा लोकरे, गणेश जाधव, रुपाली सरडे आदि लोकांची पालकांमधून सदस्य म्हणून निवड करण्यात आली तर शिक्षण तज्ञ म्हणून लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे सहशिक्षक विजयकुमार गुंड यांची निवड करण्यात आली.

या निवडीच्या बैठकीवेळी उद्योजक सतीश शेठ रुपनर, नितीन रुपनर, भैरवनाथ रुपनर, पत्रकार विनायक सालगुडे, जावेद मुलाणी, सुधीर कळसाईत, सचिन सालगुडे, अंगद पवार, गणेश सालगुडे, मुख्याद्यापिका श्रीमती. शीतल कांबळे, सहशिक्षक विकास माळी, अजित कणसे सहशिक्षिका माधुरी मोरे, वृषाली सोरटे आदि तसेच इतर पालक व महिला वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!