वांगी क्रमांक ३ जि.प शाळेच्या ‘शाळा व्यवस्थापन समिती’ ची निवड प्रकिया संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नं ३ शाळेच्या ‘शाळा व्यवस्थापन समिती’ ची निवड प्रकिया नुकतीच संपन्न झाली आहे. या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धनंजय रोकडे यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पालकातून खालील सदस्यांची निवड करण्यात आली.सौ. सुप्रिया मनोज तळेकर सौ. विद्या नागेश खराडे, श्री जयवंत दत्तू सातव श्री यशवंत दत्तात्रय भवर,सौ प्रणिता दत्ता मेनकुदळे, सौ अनिता महेंद्र शिंदे. श्री नागनाथ सुभाष वाघमोडे,श्री. प्रकाश बबन तेलंग. सौ ज्योती बाळासाहेब कांबळे, शिक्षक तज्ञ श्री. मारुती पंडित रोकडे तर ,ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री रतन सुखदेव सातव. शिक्षक प्रतिनिधी श्री जालिंदर कणसे. तर सचिव म्हणून श्री आदिनाथ यशवंत राऊत यांची निवड करण्यात आली.
या निवडीच्या बैठकीवेळी अध्यक्षस्थानी गावचे सरपंच मयूर महादेव रोकडे हे होते तर यावेळी शाळेतील सर्व पालक,ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.


