केम-रोपळे रस्त्याची मोठी दुरावस्था - शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा - Saptahik Sandesh

केम-रोपळे रस्त्याची मोठी दुरावस्था – शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम-रोपळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे हा रस्ता १५ ऑगस्ट पर्यंत दुरूस्ती न केल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रमुख सौ वर्षां ताई चव्हाण यांनी एका लेखी निवेदनाद्वारे अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कडे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केम रोपळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खडयात रस्ता हे समजत नाही. या रस्त्यावर ची खडी उखडली आहे. जागो जागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहनधारकांना गाडया चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोटारसायकल घसरून लहान,मोठे अपघात होत आहेत. केम-रोपळे हा रस्ता मुंगशी, परंडा मार्गे मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. केम-रोपळे हा दहा कि.मी रस्ता आहे. परंतु या रस्त्यावरून केम-रोपळे ला जाण्यासाठी पाऊन तास लागून त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे खडयात पाणी साचले आहे. वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे केम जवळ नाल्या शेजारी पडलेल्या खडयात गाडया अडकून दुचाकी वाले डबलशिट असलेले पडतात. त्यामुळे लहान मोठे अपघाताची मालिका सुरू आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेस या घटना घडतात. या रस्त्यामुळे सर्वानाच मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या भागातील नागरिक वारंवार मागणी करूनही याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष केले जात आहे.
तरी या बाबीचा विचार करून १५ ऑगस्ट पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन केले जाईल याची जबाबदारी संबंधित खात्यावर राहिल असा इशारा निवेदनात दिला आहे.

या रोडच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना रात्री, अपरात्री गावात कोठल्याही कामासाठी जावे लागते रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून गाडया चालवताना जीव मुठीत घेऊन गाडया चालवाव्या लागतात एखादया रूग्णांला दवाखान्यात आणायचे म्हटले तरी त्याला यातना सहन कराव्या लागतात त्यामुळे अजून आजार वाढतो. केम-रोपळे-कंदर हा रस्ता मंजूर आहे आम्ही खूप दिवसांपासून ऐंकतोय पण रस्त्याचे काम कधी सुरू होणार माहिती नाही.

शशिकांत मुरलीधर तळेकर, केम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!