करमाळा बस स्थानकावर काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी निधी मंजूर - माजी आमदार नारायण पाटील - Saptahik Sandesh

करमाळा बस स्थानकावर काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी निधी मंजूर – माजी आमदार नारायण पाटील

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा बस स्थानकात सिमेंट काँक्रिटीकरणचे काम लवकर सुरू होणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गेले तीन वर्षे झाले मी या कामाचा पाठपुरावा करत होतो यापूर्वी महाविकास आघाडी एका कामास एक कोटी ८९ लक्ष रूपये इतका निधी मंजूर करुन घेतला परंतु नंतर तांत्रिक अडचणी मुळे या कामाची निविदा काढण्यात येऊनही सुरूवात झाली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण या कामाचा सतत पाठपुरावा सुरू ठेवला. मंजूरी स्थगितीवर अडकल्याने नवीन प्रशासकीय मंजुरी घेऊन या कामास आता दोन कोटी रुपये मंजूर झाले. यामध्ये करमाळा बस स्थानक आवारात संपूर्ण भागाचे सिमेंट काँक्रीट करण्यात येणार आहे माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये करमाळा कुर्डवाडी बस स्थानकाचे नूतनीकरण झाले आता नव्याने अपुरे कामे सुरू करण्यात येतील. या कामी महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

केमला येणाऱ्या मुक्कामी एसटी गाड्या गावापासून एक किलोमीटर असलेल्या आश्रम शाळेतील मैदानावर मुक्कामी थांबतात व दिवसा रंदवे गुरूजी यांच्या खाजगी जागेत एसटया वळून जातात. उद्या या जागेत रंदवे गुरुजी यांनी बांधकाम केले तर एसटी कोठून वळणार हा प्रश्न उपस्थित राहणार आहे. त्यामुळे एसटीच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी एखादे छोटे बसस्थानक केमसाठी करण्यात यावे. यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे.

मिलिंद नरखेडकर,केम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!