प्रभागाची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी माजी नगरसेवकाने घेतली स्वखर्चाने विंधन विहीर
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये सतत पाण्याची टंचाई उदभवत असल्यामुळे नागरिकांच्या सोयी साठी प्रभाग क्रमांक दोनचे माजी नगरसेवक संजय सावंत यांनी स्वखर्चाने सावंत गल्ली येथे नवीन विंधनविहीर घेतली आहे
आज सकाळी अकरा वाजता सामाजिक कार्यकर्ते मार्तंड सुरवसे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन विंधनविहीर चे काम चालू करण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय सावंत करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार नागेश उबाळे पांडुरंग सावंत,बापु उबाळे मैनुद्दीन शेख सतीश भिसे औदुम्बर उबाळे काटकर गणेश सावंत महेश भागवत गणेश सावळकर आदी जण उपस्थित होते. या सामाजिक कार्यामुळे माजी नगरसेवक संजय सावंत यांचे शहरातून कौतुक होत आहे.
करमाळा नगरपालिकाचा अनेक वेळा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे याभागात प्रामुख्याने पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे मी स्वखर्चाने विंधनविहीर घेतली असुन याच्या शेजारी असणारे सार्वजनिक शौचालयास देखील याचा उपयोग होणार असुन शौचालयाची स्वच्छता होईल.
– संजय सावंत माजी नगरसेवक, करमाळा