गटातटाचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा – रामदास झोळ
करमाळा (दि.१९) – गटातटाचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा, असे आवाहन करमाळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ करमाळा शहरात झालेल्या सभेत केले. करमाळा शहरात औद्योगिकीकरणाला वाव देऊन रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार, आरोग्याचा प्रश्न सोडवून बाजारपेठेला गत वैभव मिळवून देण्यासाठी एक वेळ आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर दशरथ कांबळे, शिवाजी पाटील, लालासाहेब जगताप, अनुरथ झोळ, भगवान डोंबाळे, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रा. माया झोळ, भाग्यश्री गरड, श्रीकांत साखरे-पाटील, सत्यवान गायकवाड, चंद्रशेखर जगताप, रिधोरेच्या सरपंच उर्मीला शिंदे, जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, प्रशांत बागल, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, उपाध्यक्ष सुहास काळे-पाटील, कल्याण महाराज खाटमोडे, जैन्नुद्दीन शेख, माजी सरपंच निवृत्ती साखरे, दादा साखरे, कल्याण दुरंदे, रघुनाथ मोरे, गणेश जाधव, नवनाथ साखरे, अॅड. नानासाहेब बागल, पांडुरंग ताकमोगे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. झोळ म्हणाले, करमाळा शहरातील प्रश्नांबाबत प्रस्थापितांनी फक्त आश्वासन दिले असून अद्याप कोणतेही काम झाले नाही. शहराला चार-पाच दिवस पाणी येत नाही, स्वच्छता नाही, नगरपालेकडून सुविधा मिळत नाहीत. शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी, नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी आपण नक्कीच काम करू. आपण करमाळा शहराजवळ देवळाली येथे २० एकर जागा घेतली असून २०२६ पर्यंत व्यवसायिक शिक्षणासाठी शिक्षण संकुल उभा करणार आहोत. एमआयडीसी सुरू करून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देणार आहे. झोळ फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार आहे. गटातटाचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा, असे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले.
प्रा. झोळ म्हणाले, ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे. २००९, २०१४, २०१९ ला जे उमेदवार होते, त्यांच्या घरातील आमदार होऊन गेले तीच माणसे पुढे निवडणूक लढवत आहेत. मी एक शेतकऱ्याचा मुलगा एक सक्षम पर्याय म्हणून त्यांच्यासमोर उभा आहे. गेली वीस पंचवीस वर्षांपासून काम करत आहे. भिगवण येथे दत्तकला शिक्षण संस्था स्थापन – करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्याचे काम केले आहे. बारामती, अकलुज, इंदापूर प्रमाणे करमाळा शहर सर्व सुविधायुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दशरथ कांबळे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेचे दीड हजार आपणास – पुरणार का? आता मुलांना भत्ता चालू केल्याने सुधारणार नाही. उलट गुन्हेगार, व्यसनाधीनता . वाढणार आहे. एकमेकांवर वार करणारे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आमची पिढी शिक्षीत करायची असेल तर प्रा. रामदास झोळ यांच्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी सुनिल रोडे, रघुनाथ मोरे, सतीश सुपेकर, साहेबराव वाघमारे यांनी झोळ परिवारात प्रवेश करून समर्थन जाहीर केले. यावेळी सिध्देश्वर घुगे, माया झोळ, . जैनुद्दीन शेख, प्रशांत बागल, उर्मिला शिंदे, न खाडे यांनी मनोगत व्यक्त केली.