केम ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चिठ्ठी द्वारा ६ प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
१७ सदस्य असलेली केम ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून सहा प्रभागामध्ये ही विभागली आहे. सुरूवातीला ग्रामसेवक कळसाईत जी.आर. यांनी आरक्षण सोडतीची माहिती सांगितली. तलाठी प्रमोद चव्हाण यांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या डब्यात टाकल्या होत्या. केम मधील सहा वर्षाच्या मुलाला त्या डब्यातील चिठ्ठ्या काढायला लावल्या व त्यानुसार प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले.
यानुसार सरपंच पद ओबीसी साठी राखीव असणार आहे. सरपंच पदाची निवडणूक जनतेतून होणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
- प्रभाग क्रमांक – १
- १) सर्व साधारण स्त्री
- २) सर्व साधारण
- ३) सर्व साधारण स्त्री
- प्रभाग क्रमांक – २
- १) अनुसूचित जाती
- २) सर्व साधारण स्त्री
- ३) ओबीसी सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक – ३
- १) सर्व साधारण पुरुष
- २) सर्व साधारण स्त्री
- प्रभाग क्रमांक – ४
- १) अनुसूचित जाती स्त्री
- २) ओबीसी सर्वसाधारण
- ३) सर्व साधारण स्त्री
- प्रभाग क्रमांक – ५
- १) सर्व साधारण
- २) सर्व साधारण
- ३) ओबीसी – स्त्री
- प्रभाग क्रमांक – ६
- १) सर्व साधारण
- २)सर्व साधारण स्त्री
- ३)ओबीसी – स्त्री
या वेळी माजी सरपंच अजित तळेकर, सरपंच आकाश भोसले, विष्णू पारखे, अच्युत काका पाटील सागर दौड, संदिप तळेकर बाळू म्हेत्रे सागर गोडसे नवनाथ देवकर, श्रीहरी तळेकर प्रसाद गाडे विष्णू ओहोळ आवीनाश तळेकर, रमेश पवार राहुल कोरे विजय ओहोळ ढेरे दाजी तानाजी केंगार दादा अवघडे मुनिराज पोळके बापुराव तळेकर महादेव पाटमास सागर कुरडे, अनिल दोड,संजय वाघमारे,शिंदे गुरूजी विष्णू अवघडे सर्प मित्र अवघडे प्रभू घाडगे आदीजन उपस्थित होते. या शिवाय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.