रावगांव येथे शिक्षक दिनी १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – रावगाव येथे शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी विविध शाळेतील १० शिक्षकांना संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान करमाळा एसटी आगाराचे आगार प्रमुख वीरेंद्र होनराव यांनी भूषविले. यावेळी एकूण दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये १) डॉ. प्रा. मच्छिंद्र नागरे श्री उत्तरेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज केम २) अरविंद आदिनाथ हिंगसे श्री भैरवनाथ विद्यालय निमगाव गांगुर्डा ता. कर्जत जि. अहमदनगर ३) रोहित हनुमंत माने – जिजामाता प्रशाला अकलूज ४) किरण बाबुलाल परदेशी – पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव ५) हनुमंत छंदर रासकर पंडित – जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव ६) संदीप देवीचंद तेलंगे शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे ता. करमाळा ७) मारुती पांडुरंग जाधव – महात्मा गांधी विद्यालय करमाळा ८) रोहिणी रघुनाथ चव्हाण- बरडे जि. प. प्रा. शाळा रावगाव ९) महेंद्र एकनाथ शिंदे जि . प्रा. शाळा रावगाव १०) पोपट गणपत शेळके संचालक शेळके क्लासेस आदींना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार श्री बाबासाहेब गायकवाड बोलताना म्हणाले की, जगामध्ये स्वतःचे स्थान उच्च करायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आज घेतलेला कार्यक्रम खूपच कौतुकास्पद आहे असे उदगार श्री गायकवाड यांनी काढले. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी श्री.पाटील बोलताना म्हणाले की प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या शिक्षकांचा जो सन्मान होतोय तो खूप चांगला आहे. शिक्षक समाजातील भविष्य घडवण्याचं काम करतो त्यामुळे शिक्षकांचा झालेला सन्मान योग्य आहे असे पाटील म्हणाले. यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की ज्या देशाचे शिक्षक हुशार असतात त्या देशाला कोणीही हरवू शकत नाही म्हणून आपल्या देशातील शिक्षकांनी मुलांची भवितव्य घडवण्यासाठी सदैव क्रियाशील राहिली पाहिजे आणि म्हणूनच जे उपक्रमशील व प्रयत्नशील शिक्षक आहेत त्यांचे आम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करत आहोत असे कांबळे बोलताना म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमाला नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड करमाळा एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री होनराव गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील मकाईचे संचालक गोवर्धन करगळ पंचायत समिती सदस्य विलास मुळे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रवीण कांबळे ग्रामपंचायत सदस्य संदीप शेळके मकाईचे मा. संचालक प्रताप बरडे मा. सरपंच विलास बरडे नानासाहेब जाधव रावगांव मा. ग्रामपंचायत सदस्या अविदा (ताई) कांबळे जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे सचिन माने, रावगांव ग्रामपंचायत सदस्य रामदास बाबर पत्रकार आलिम शेख ढावरे सर केंद्रप्रमुख विश्वनाथ निरवणे बौद्धाचार्य सुहास ओहोळ शहाजी शिंदे ज्ञानेश्वर बरडे बाजीराव पवार कोळेकर सर राजाभाऊ पवार हनुमंत लोंढे गणेश पवार कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले तर आभार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी मानले.