वडगाव येथील रक्तदान शिबिरात १०५ जणांनी केले रक्तदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – वडगाव (ता.करमाळा) येथील इंस्पायरयु फाउंडेशन संचलित महुजाई संकुलच्या वतीने आज (दि.७) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 105 जणांनी रक्तदान केले. सामाजिक कार्यकर्ते व चार्टर्ड अकाउंटंट लहू काळे यांच्या असलेल्या 35 व्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केले होते.
रक्तदान संकलन करण्याचे काम करमाळा येथील कमला भवानी ब्लड सेंटरच्या वतीने करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटक यशकल्यानी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महुजाई संकुलाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी वडगाव येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
लहू काळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महुजाई संकुल तर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये सूर्यतेज डेअरी मधून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिला जातो. गावातील गरजवंतांना शिक्षण व दवाखान्यासाठी महुजाई संकुल तर्फे मदत केली जाते, गावातील गरजू निराधारांना अन्नधान्याचे किट वाटप असेल ,वृक्षारोपण,असे एक ना आनेक सामाजिक उपक्रम महुजाई संकुल तर्फे राबवली जातात.. गावामध्ये तरुणांसाठी मोफत आधुनिक व्यायाम शाळा व तालीम उभारण्यात आले आहे.यामुळे वडगावची करमाळा तालुक्यामध्ये विशेष ओळख निर्माण झालेले आहे.