गणेशोत्सवानिमित्त करमाळा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न
करमाळा, दि. २३ – करमाळा शहरातील राशिन पेठ तरुण सेवा मंडळ व शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२३) भव्य आरोग्य, रक्तदान, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख व करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात करमाळा शहरातील सर्व डॉक्टर्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगर, पुणे, बार्शी येथील डॉक्टरांकडून ECG तपासणी, शुगर तपासणी, नेत्र तपासणी, कॅन्सर तपासणी इत्यादी आरोग्यविषयक तपासण्या मोफत करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, श्री विनायक चिवटे, श्री अनिल वशिंबेकर, श्री दीपक पाटणे, श्री जगदीश अगरवाल, श्री गणेश चिवटे, युवा उद्योजक श्री प्रकाश पाटील , श्री जयदीप किरवे आदी उपस्थित होते,तर आकाश चिवटे,प्रितम खुटाळे,प्रसाद किरवे,शिवम कोकीळ,ओंकार मगरगट्ट,सौरभ किरवे,शिवम कोरे,प्रसाद कोकीळ,कौशल किरवे,दुर्गेश चिवटे,सार्थक कुर्डे,राज भोसले,राजपारवडकर ,ऋषिकेश अग्रवाल,चैतन्य किरवे दिग्विजय चिवटे, सतिश आतारी, यशोदिप किरवे,रुद्राक्ष शिलवंत आदीजणानी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यास परिश्रम घेतले.