केम येथे ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ या ग्रंथावर आधारित परीक्षेतील विजेत्यांना बक्षीस वाटप कार्यक्रम संपन्न

केम- केम (ता. करमाळा) येथे भारतीय बौध्द महासभा शाखा केम यांच्या वतीने दि. २ जुलै रोजी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर आधारित परीकक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये हिम्मत हिवराळे – प्रथम, पल्लवी शिंदे- द्वितीय तर जयश्री कांबळे – तृतीय असे बक्षीस वितरण झाले.
याशिवाय विशाखा पोळके समाधान दणाने, चंद्रकांत गाडे, अमोल खरात,कोमल कांबळे, दिक्षा कांबळे,यश कांबळे,अजय कांबळे, पूजा कांबळे,सृती साळवे,शिवानी गाडे, मंदाकिनी कांबळे, शोभा कांबळे,सई कांबळे, पुष्पा कांबळे,सागर पोळ, प्रशांत भोसले,भागवत माने, नितीन माने, जागृती साळवे यांनाही सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
झालेल्या स्पर्धेत १०० ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले गेले ज्याला १०० मीनिट वेळ स्पर्धकांना दिला गेला होता. या स्पर्धेतून निवडलेल्या प्रथम विजेत्याला ५००० ₹ रुपये पारितोषिक व ट्रॉफी, व्दितीय विजेत्याला ३००० ₹ पारितोषिक व ट्रॉफी तर तृतीय विजेत्याला पारितोषिक २००० ₹ व ट्रॉफी जाहीर केली होते. ही स्पर्धा केम मधील शा.गो.पवार विद्यालय येथे दि. २ जुलै रोजी सकाळी ११ ते १२:४० या वेळेत आयोजित केली होती.

बक्षीस वाटप कार्यक्रमावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप, बौध्दाचार्य केम शाखाध्यक्ष भालचंद्र गाडे जिल्हा संघटक संजय तुपारे पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले सामाजिक कार्यकर्ते प्रविण सोडले रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते रामदास कांबळे सावताहारी कांबळे बापू उघडे इत्यादी उपस्थित होते. सुहास ओहोळ यांनी मनोगत व आभार मानले.

