पुनवर ते वडगाव रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली – राजे शिवछत्रपती मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

करमाळा(दि.२६) : समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने राजे शिवछत्रपती मित्र मंडळ पुनवरच्या सर्व सदस्यांनी पुनवर ते वडगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढण्याचे ठरविले. नुकतेच जेसीबीच्या साहाय्याने ही काटेरी झुडुपे काढली त्यामुळे वाटसरूंना ये जा करण्यासाठी रस्ता सुरळीत झाला. काटेरी झुडपे काढल्यामुळे राजे शिवछत्रपती मित्र मंडळ पुनवर चे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.






