करमाळ्यामधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन!
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल (दि.२६) करमाळा शहरातील सरकार मित्रमंडळाच्या गणपतीच्या आरतीचा मान करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांना देण्यात आला होता. तसेच यावेळी मुस्लिम बांधवांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरकार मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी सरकार मित्र मंडळाच्या वतीने हाजी अल्ताफशेठ तांबोळी, फारुक जमादार हाजी फारुक बेग सुरज शेख जमीर सय्यद मुस्तकीन पठान जहांगीर बेग रमजान बेग जावेद पठाण मुन्ना शेख शायर बागवान आदी जणांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरकार मित्र मंडळाचे विनय ननवरे, विजय लावंड, सचिन घोलप सचिन गायकवाड़ अमोल यादव,अजित यादव, संतोष वारे, अरूण जगताप,अमर शिंगाडे, हर्षराज बिले आदी जण उपस्थित होते.
करमाळ्यामधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे नेहमीच दर्शन दिसून येत असते. करमाळा शहरातील फुलसौंदर चौकातील जामा मस्जिद मधून गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तींवर मस्जिदमधून पुष्पवृष्टी करण्यात येते. तसेच शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकिमध्ये मुस्लिम बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातो. हिंदू बांधव देखील मुस्लिम बांधवांचा वेळोवेळी सन्मान करताना दिसतात. करमाळ्यात काही गणेश मंडळांचे अध्यक्षपददेखील मुस्लिम समाजातील युवकांनी भूषविले आहे. अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मुस्लिम युवक उत्स्फूर्तपणे दिसतात. इथे रमजानच्या महिन्यामध्ये, हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित केल्या जात असतात. मुस्लिम बांधवांकडूनही रमजान ईद दिवशी शीरखुर्मा गुलगुले खाण्यासाठी हिंदू बांधवाना आमंत्रित केले जाते तर हिंदू बांधवांकडून दिवाळीमध्ये मुस्लिम बांधवांना फराळासाठी बोलावले जाते. अशाप्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन करमाळ्यामधून नेहमीच पाहायला मिळत असते जे की सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
धर्म और जातीवाद की हर दिवार को तोड दो | नफरत की लहरों को मोहब्बत की ओर मोड दो |
– एक शायरी
जो करते है कोशिश समाज को बाटने की, तुम मिलकर उसको समाज से अकेला छोड दो |