केम येथील प्रतिक्षा कळसाईतला शिष्यवृत्ती मिळाल्या बद्दल ए. पी. ग्रुपच्या वतीने सत्कार संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु प्रतिक्षा विकास कळसाईत ही एन.एम.एम.एस या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरल्याबद्दल तिचा ए.प. ग्रुपचे वतीने अध्यक्ष अच्युत काका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह ओहोळ प्रहारचे संदिप तळेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर पेंटर नितीन तळेकर शिवाजी मोळीक, विकास कळसाईत आदीजण ऊपस्थित होते.