करमाळ्यात खास शिक्षकांसाठी आयोजित कार्डिओ व सर्जरी शिबिर संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा येथील जाधव -पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे (५ सप्टेंबर) औचित्य साधून खास शिक्षकांसाठी कार्डिओ व सर्जरी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
या शिबिरात Consultation/BP/BSL/ECG या तपासण्या मोफत करण्यात आल्या व काही शिक्षकांना आवश्यक असल्यास Stess Test व 2D Echo या तपासण्या 50% सवलती च्या दरात करण्यात आल्या सदर व आपल्या आरोग्यविषयक तपासण्या करून घेतल्या सदर तपासण्या करण्यासाठी नामांकित डॉ.संदीप गाडे, डॉ.महेश घुगे, डॉ.प्रदीपकुमार जाधव -पाटील, डॉ.रोहन पाटील, डॉ.शिवानी पाटील, डॉ.सागर कोल्हे, डॉ.आशुतोष कापले, डॉ.अशोक शिंदे, डॉ.हर्षवर्धन माळवदकर व हाॅस्पिटल मधील स्टाफ यांनी परिश्रम घेतले. “ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरूजणांची शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवा करण्याची संधी मिळाली हे मी भाग्य समजतो असे प्रतिपादन जाधव-पाटील हॉस्पिटलचे डॉ.रोहन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
शिबिराची सुरूवात प्रथमतः मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करून केली त्यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री सुग्रीव नीळ साहेब, श्री आदिनाथ देवकते, श्री निशांत खारगे, श्री बाळासाहेब वाघमोडे , श्री मधुकर शिंदे , श्री अरूण चौगुले, श्री सतिश चिंदे, श्री विनोद वारे, श्री सुनिल नरसाळे, श्री अजित कणसे, श्री दादासाहेब जाधव, श्री शकूर शेख , श्री प्रताप राऊत, श्री मुचकुंद काळे श्री अशोक दुधे, श्री सयाजीराजे ओंभासे, श्री राजकुमार खाडे, श्री नानासाहेब मोहिते, श्री विक्रम राऊत त्याचबरोबर शंभर शिक्षक उपस्थित होते
शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेने खूप परिश्रम घेतले अशी माहिती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिली