दिव्यांग मुलांसोबत लग्नाचा वाढदिवस केला साजरा

केम(संजय जाधव)- प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुका संपर्क प्रमुख व मी वडार महाराष्ट्राचा संघटना करमाळा तालुकाध्यक्ष सागर पवार यांनी आपली पत्नी सौ निकीता पवार यांच्यासोबत ४ डिसेंबर रोजी असलेल्या आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस केम येथील श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयात साजरा केला.
पवार हे दर वर्षी स्वतः चा व स्वतः च्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या हॉटेल मध्ये किंवा स्वतः च्या घरी नं करता दिव्यांग मुलांसोबत साजरा करतात. या वेळेस देखील याच पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमास उपस्थित असलेले जनता बँकेचे चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दिलीप दादा तळेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. व प्रमुख पाहुणे म्हणून राहुल आबा कोरे सरपंच केम हे होते. तसेच या कार्यक्रमासाठी घोटीगावचे रील स्टार श्री सयाजी थोरात,मेंबर रमेश दादा पवार उपस्थित होते तसेच श्री सागर भाऊ पवार यांचे नातेवाईक व मित्र यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी पवार परिवाराकडून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप दादा यांनी श्री सागर पवार व निकिता यांचे वैवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचेही भरभरून कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले शाळेविषयी ची माहिती श्रीमती जाधव मॅडम यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चव्हाण सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री नाळे सर यांनी मानले.




