करमाळा येथील क्षितिज महिला ग्रुप तर्फे श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नदान लाभार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सालाबादप्रमाणे या वर्षीही करमाळा शहरातील क्षितिज महिला ग्रुप तर्फे श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नदान लाभार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून शहर व तालुक्यातील निराधार वृद्ध आजी-आजोबांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते. हा उपक्रम श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या अन्नपूर्णा योजनेतील वृद्ध निराधार आजी-आजोबांना क्षितिज महिला ग्रुप करमाळा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षीही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.


यावेळी क्षितिज महिला ग्रुपच्या डॉ. सुनिता दोशी व स्वाती माने यांनी श्रीराम प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या नंतर श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य भीष्माचार्य चांदणे, विलास जाधव यांनी क्षितिज ग्रुपचे आभार मानले. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य रामभाऊ ढाणे, संग्रामसिंह परदेशी, संजय किरवे,महादेव गोसावी व क्षितिज महिला ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


