केम येथील उद्योजक लोकरे यांच्याकडुन वाघोली मधील मंदिराला १ लाख २० हजार रुपये देणगी प्रदान - Saptahik Sandesh

केम येथील उद्योजक लोकरे यांच्याकडुन वाघोली मधील मंदिराला १ लाख २० हजार रुपये देणगी प्रदान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – मूळचे केम येथील व सध्या व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेले उद्योजक आजीनाथ लोकरे (रा.चंदननगर-खराडी) यांनी वाघोली (पुणे) येथील तुकाराम महाराज यांचे सुरू असलेल्या मंदिरांच्या बांधकामासाठी एक लाख एकवीस हजार रुपये देणगी दिली आहे.

या वेळी मंदिरा बांधकाम समितीचे कैलास सातव महाराज, नवनाथ सातव व तुकाराम महाराजाचे नववे वंशज मोरे काका ऊपस्थित होते. या वेळी समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

आजीनाथ लोकरे हे मुळचे केम गावाचे नागरिक आहेत त्यावेळी परिस्थिती गरीबीची होती जगण्यासाठी ते पुण्याला गेले. त्यांनी पुण्यात क्लीनर म्हणुन काम केले ते पुन्हा ड्रायव्हर झाले. त्यानंतर ते आपल्या कर्तृत्वाने मोठे उद्योजक झाले. श्री. लोकरे हे सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर आहेत. अनेकांना दवाखान्यासाठी पैशाची मदत करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक फि अगर कोठली ही अडचण असो ते मदतीचा हात देतात.

दि १ जून रोजी केम येथे ए.पी. ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या शासकीय वाढदिवस निमित्त आजीनाथ लोकरे यांच्या कडून केम गावातील १०१ जेष्ठ नागरिकांना वाढदिवसा निमित्त म्हातारपणी आधार म्हणून स्टिलच्या १०१ काठया वाटप केल्या. या बद्ल त्यांचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!