राजुरी येथे ग्रंथ पारायण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – राजुरी (ता.करमाळा) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अधिक मासानिमित्ताने हरिविजय ग्रंथाचे पारायण आयोजित केलेले आहे. हे पारायण १८ जुलै रोजी सुरू झाले असून १५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. राजुरी येथील भजनी मंडळाने याचे आयोजन केले असून गावकऱ्यांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. अन्नदानासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला असून पारायणानंतर महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. सध्या राजुरी गावात मोठे धार्मिक वातावरण तयार झाले आहे.

याचबरोबर दिनांक १६ ऑगस्ट पासून २४ ऑगस्ट पर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात संजयानंद महाराज झानपुरे(साडे), मधुकर महाराज गिरी, (नान्नज), केशव महाराज नामदास (पंढरपूर), पांडुरंग महाराज घुले (देहू), बाळासाहेब महाराज देहूकर (पंढरपूर), मनोहर महाराज बेलापुरकर (पंढरपूर), लक्ष्मण महाराज काळे (पंढरपूर), एकनाथ महाराज हांडे, (राजूरीकर) आदी किर्तनाकारांची कीर्तने आयोजित केली आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




