ऊत्तरेश्वर मंदिरात गुरूपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात काल(दि.३) गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री ऊत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने गुरू पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले.
या निमित्त सकाळी आठ वाजता श्री ऊत्तरेश्वर बाबा,दत्त मंदिर,नाग देवता, नृसिंह मंदिर व विदयागिरी महाराज, रत्नागिरी महाराज,कलिंगड महाराज यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला.या नंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. दादा बोंगाळे महाराज केम यांचे कीर्तन झाले. त्यानंतर बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी मंदिरात गुलालाची उधळण करीत पुष्प वृष्टी करण्यात आली.
व श्रींची आरती झाली. त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला या धार्मिक कार्यक्रमासाठी केम ग्रामस्थ व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट महंत जयंतगिरी महाराज यांनी परिश्रम घेतले.


गुरू पौर्णिमा निमित्त श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगाला कानिफनाथाच्या रूपात सजवण्यात आले होते. ही सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
