पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मांगी ग्रामपंचायत तर्फे महिलांचा सन्मान - Saptahik Sandesh

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मांगी ग्रामपंचायत तर्फे महिलांचा सन्मान


करमाळा –  मांगी ग्रामपंचायत तर्फे मांगी येथील विविध क्षेत्रात कर्तव्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांची निवड करून त्यांना अहिल्याबाई होळकर यांच्या आज (दि.३१) असलेल्या जयंतीनिमित्ताने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मांगी येथील नऊ कर्तव्यदक्ष महिलांना मांगीतील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल यांनी दिग्विजय बागल ग्रंथालयातर्फे कर्तुत्वान महिलांना प्रशस्तीपत्र व रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित केले. यामध्ये बचत गटातर्फे कर्ज वाटप करून महिलांचे उत्पन्न वाढीचे कार्य केल्याबद्दल रेखा चव्हाण व निर्मला कांबळे यांना मांगी ग्रामपंचायत तर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. याचबरोबर महिला बचत गटाच्या  सोनाली गायकवाड, महिला प्रबोधनकार शीला अवचर ,‌ दिपाली राऊत,  कल्पना राऊत आशा वर्कर्स  अश्विनी संचेती,  मंदा जमदाडे , रेशमा अतार, यांना सामाजिक मोलाचे कार्याबद्दल ग्रंथालयातर्फे प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका सौ शोभा संचेती श्रीमती अनिता अवचर, वैशाली बागल, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मांगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री सरडे यांनी केले, यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच् कार्य किती महान होते याबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अवचर यांनी आपले विचार व्यक्त केले, यावेळी मांगी ग्रामपंचायतचे शिपाई श्री संजय सोनवणे हे निवृत्त झाले बद्दल त्यांचा श्री सुजित तात्या बागल यांच्यातर्फे शाल श्रीफळ आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला.


यावेळी केंद्रप्रमुख संतोष पोद्दार , मांगी गावचे उपसरपंच नवनाथ तात्या बागल, ग्रा सदस्य संजय कांबळे, तात्या शिंदे, पोलीस पाटील आकाश शिंदे, चांद पठाण, अभिमान अवचर , चंद्रकांत राऊत, मातंग आघाडीचे श्री रेवनाथ शिंदे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्या स्नेहल अवचर यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!