जेऊर मध्ये संभाजी ब्रिगेडने इफ्तार पार्टी केली आयोजित

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथील अलिफ मस्जिद येथे इफतार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या वेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की संभाजी ब्रिगेड ही फक्त हिंदू लोकांसाठी काम करणारी संघटना नसून सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन चालणारी संघटना आहे. समाजामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने ही इफ्तार पार्टी आयोजित केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके,शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अतुल निर्मळ, राकेश पाटील, संभाजी ब्रिगेड ता अध्यक्ष सुहास पोळ, हेमंत शिंदे, पिंटु जाधव,अदिनाथ माने,सागर बनकर, रमीज शेख, रहेमान पठाण, रज्जाक पठाण,अमित संचेती,मुजाहीद फकीर, सुहास शिंदे, अभिजीत म्हमाणे, अविनाश घाडगे, सलीम शेख,आमिर फकीर, अरुण तावरे, इकबाल पठाण, हाजिमलंग शेख,समीर पटेल,शब्बीर शेख, आदि बहुसंख्यने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.