तोफांची सलामी देत निवृत्तीनाथांच्या पालखीचे केम येथे स्वागत

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – पंढरपूर येथून पौर्णिमाचा काला घेऊन त्र्यंबकेश्वरला निघालेल्या पालखीचे परतीच्या मार्गावर केम येथे दि.५जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. या वेळी केम ग्रामस्थ व श्री राम भजनी मंडळ यांच्या वतीने तोफांचा सलामीने जोरदार स्वगत करण्यात आले.

त्यांनतर पालखी श्रीराम मंदिराकडे निघाली यावेळी संपूर्ण केम नगरी “निवृत्ती नाथ महाराज की जय!” अशा नाम घोषाने दुमदुमून गेली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी गांधी चौकात आल्यावर श्रीमंत बोंगाळे यानी वारकऱ्यांना मोफत पाण्याच्या बिस्लरी वाटप केल्या. पालखी श्रीराम मंदिरात प़ोहचल्या नंतर श्रींची आरती झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी वारकऱ्यांना भोजन दिलें. रात्री ९ ते ११ या वेळेत निवृत्ती नाथ महाराज यांचे पुजारी ह.भ.प. गोसावी महाराज यांचे वाटचालीचे कीर्तन झाले. त्यानंतर गावकऱ्यांचा हरिजागर झाला. सकाळी ठिक सात वाजता ग्रामस्थांच्या पुजा झाल्या त्यानंतर माजी जि.प.सदस्य संजय देवकर, बाबा मोरे यांनी वारकऱ्यांना सकाळी नाष्टा दिला. पालखी ने निंभोरे झरे कडे पुढील मुक्कामी प्रस्थान केले. या वेळी केम ग्रामस्थांनी निवृत्ती नाथ महाराज पालखीस निरोप दिला. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

