प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगांव येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – रावगाव येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने विषयी मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे उपस्थित होते.

यावेळी श्री.चिवटे बोलताना म्हणाले की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना खूप चांगली आहे. याचा सर्व तरुण शेतकरी युवक महिला बचत गटाचे सदस्य यांनी लाभ घ्यावा व गावातच रोजगार निर्माण करावा. तसेच प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच योजनांचे उपक्रम राबवावेत. यावेळी कृषी विभागाचे मनोज बोबडे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी घ्यावा या योजनेच्या माध्यमातून ३५% अनुदान दिले जाते. तरी गावातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा व काही आवश्यकता लागल्यास कृषी विभागाला संपर्क साधावा.

यावेळी रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव लिंबेवाडी चे सरपंच किरण फुंदे मकाई कारखान्याचे संचालक गोवर्धन करगळ माजी ग्रामपंचायत सदस्य दासा बापू बरडे भाजपा तालुका उपाध्यक्ष आजिनाथ सुरवसे रायगाव चे मा. उपसरपंच काका पवार प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे राजाभाऊ पवार आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्कर पवार भाऊसाहेब करगळ रहमान शेख कृषी विभागाचे श्री.नवले मनोज बोबडे, भांडवलकर साहेब सोसायटी चेअरमन शहाजी सुरवसे माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बुधवंत अतुल पवार कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर खाडे हनुमंत लोंढे पप्पू पवार लखन पवार अमोल पवार राहुल गोसावी पंडित नागवले प्रल्हाद कांबळे आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले तर आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!