अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त केम येथे वर्षांताई चव्हाण व अन्नपूर्णा कळसाईत यांचा सन्मान

केम (संजय जाधव) – केम तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरूवातीला अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि.प. सदस्य दिलीपदादा तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमित्ताने सामजिक क्षेत्रात योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय हा पुरस्कार करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षां ताई चव्हाण व अन्नपूर्णा महिला बचतगट अध्यक्षा अन्नपूर्णा नारायण कळसाईत यांना माजी जि.प. सदस्य व जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप दादा तळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी सरपंच आकाश भोसले, माजी सहशिक्षक दिलीप देवकर, मिस्त्री तानाजी दोंड,पोस्ट मास्तर राजेंद्र दोंड, बाळू भोसले, राहुल कोरे, दादासाहेब अवघडे, वेदपाठक मॅडम आदि उपस्थित होते.

