महसूल सप्ताह निमित्ताने तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी साडे-सालसे येथील जवानांच्या समाधी स्थळांना दिली भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – महसुल सप्ताहाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील साडे व सालसे येथील शहिद जवानांच्या समाधी स्थळांना उपविभागिय अधिकारी समाधान घुटकडे,करमाळा तहसिलदार विजयकुमार जाधव यांनी भेट देऊन पुष्पांजली वाहिली. यामध्ये सालसे येथील शहिद जवान जयहिंद पन्हाळकर,साडे येथील शहीद जवान अमोल निलंगे व शहीद जवान हंबीरराव चौधरी यांचा समावेश होता.
एक ऑगस्ट पासून राज्यभरात सुरू असलेल्या महसूल सप्ताह अंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत सालसे मंडळातील मौजे साडे व सालसे येथील शहीद जवान यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्पांजली वाहिली. तसेच शहीद जवान यांच्या कुटुंबातील वारसांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या वारसांना मोफत 7/12 वाटप करण्यात आले.यावेळी सालसे मंडळ अधिकारी अमितकुमार कलेटवाड, सालसे व साडे तलाठी महालिंग बिराजदार, नेरले तलाठी परमेश्वर सलगर ,शिवाजी पन्हाळकर ,बाजीराव पन्हाळकर ,संतोष ओहोळ सह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या सप्ताहाच्या निमित्ताने सालसे मंडलमध्ये महसुल दिन , आधार कॅम्पचे आयोजन,एक हात मदतीचा ,जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी,महसुल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत अधिकारी अन् कर्मचारी संवाद असे विविध ऊपक्रम राबवण्यात येत असून महसुल सप्ताहाच्या सांगता समारंभार सात ऑगस्ट रोजी सालसे येथील मंडल कार्यालयात ऊपस्थित राहण्याचे आवाहन मंडल अधिकारी अमितकुमार कलेटवाड व तलाठी महालिंग बिराजदार यांनी केले आहे.