साडे येथे ६ सप्टेंबर पासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – साडे (ता.करमाळा) येथे बुधवार दि.६ सप्टेंबर ते बुधवार दि.१३ सप्टेंबर या दरम्यान अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह साडे येथील सिद्धेश्वर मंदिरात होणार आहे.


यामध्ये पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा होणार आहे. या सप्ताहामध्ये रोज सकाळी ८ ते १० या वेळेत साडे येथील ह.भ.प.संजयानंद महाराज झानपुरे (तात्या) यांचे किर्तन असणार आहे. सकाळी १० ते ११ भोजन, ११ ते १ श्री शिवलीलामृत पारायण होणार आहे. यानंतर सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ८ प्रवचन , ८ ते १० हरिकीर्तन व १० ते ११ भोजन असणार आहे.

सप्ताहामध्ये रोज सायंकाळी ८ ते १० दरम्यान विविध किर्तनाकारांची कीर्तने असणार आहेत. यामध्ये ह.भ.प. हरीदादा महाराज झानपुरे, ह.भ.प.मंदारदादा महाराज सरवदे, ह.भ.प.गोरख (काका) महाराज सुपे, ह.भ.प.सागरदादा महाराज झानपुरे, ह.भ.प.धनुदादा महाराज सरवदे, ह.भ.प.संजयानंद महाराज झानपुरे (तात्या) साडेकर आदी किर्तनाकारांची किर्तने आहेत. बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वेळेत ह.भ.प.संजयानंद महाराज झानपुरे (तात्या) साडेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाचा समारोप होईल.

या सप्ताहाच्या कालावधी मध्ये साडे ग्रामस्थांच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

