मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष निवडी बद्दल सचिन काळे यांचा उमरड येथे सत्कार संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी सचिन काळे यांची निवड करण्यात आली. त्या बद्दल उमरड ग्रामस्थांच्या वतीने ओमराजे कृषी केंद्रात काळे यांचा सत्कार करण्यात आला.
सचिन काळे हे दुसऱ्यांदा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पुरुषोत्तम खेडेकर व रेखाताई खेडेकर यांच्या उपस्थितीत काळे यांना निवडीचे पत्र दिले आहे. ग्रामीण भागाशी नाळ असणारे सचिन काळे हे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत. या पुढेही शाहू-फुले-आंबेडकर विचारश्रेणीने मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन बहुजन हिताची अनेक कामे करणार व ग्रामीण भागातील युवकांना एकत्र करून सुयोग्य दिशा देणार असल्याचे प्रतिपादन सचिन काळे यांनी यावेळी केले.
या सत्कार प्रसंगी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम,उमरड गावचे मा.सरपंच संदिप मारकड, प्रगतशील शेतकरी अगतराव मारकड, चौधरी मेडिकलचे मालक नंदकिशोर चौधरी, बापूराव बंडगर, प्रा. नंदकिशोर वलटे, पै.श्रीरीष मारकड आदी जण उपस्थित होते.


