मांगी ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे येणाऱ्या काळात एक हजार पर्यावरण पूरक वृक्ष लावणार सुजित बागल
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – येणाऱ्या काळामध्ये मांगी ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे एक हजार पर्यावरण पूरक वृक्ष लावणार असल्याचे प्रतिपादन सुजित बागल यांनी मांगी येथे केले. मांगी येथील शेतकरी कुटुंबातील आबा चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मांगी येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा हस्ते वडाचे झाड लावण्यात आले. यावेळी सुजित बागल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या मोहिमेत गावातील सुज्ञ नागरिकांनी सहभागी होउन गावातील पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा. येणाऱ्या काळामध्ये गावातील मृत व्यक्तीच्या स्मुर्ति प्रित्यर्थ टी गार्ड सहीत अल्पदरामध्ये वृक्ष वाटप केले जाणार आहे. यावेळी मांगी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.