ऊत्तरेश्वर मंदिरात चौथ्या सोमवारी शिवलिंगास २१८१६ बेल पत्र वाहण्याचा सोहळा संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात चौथ्या सोमवार निमित्त बेल पत्र वाहण्याचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त मंदिरामध्ये आज (दि.११ सप्टेंबर) पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती. याचे नियोजन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटनेचे वतीने करण्यात आले.
या साठी एक दिवस अगोदर संघटनेचे कार्यकत्यांनी बेलाचे फंटे आणले होते. एकूण १०१ जोडयानी सहभाग नोंदविला होता. मंदिरात मोठे शिवलिंग केले १० पुरूषांनी मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाला बेलपत्र वाहिली तर महिला भाविकांनी मंदिरातील शिवलिंगास प्रत्येकानी १०८बेलपत्र वाहिली एका जोडिचे २१६ बेलपत्र झाले या प्रमाणे एकूण १०१ जोडप्याचे २१८१६-बेल पत्र वाहण्यात आली या दुपारी १ वा.श्री ची आरती होऊन याची सांगता झाली त्यानंतर देवस्थान ट्रस्टचे वतीने भाविकांना महाप्रसाद चे वाटप करण्यात आले या सोहळ्यासाठी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री ऊत्तरेश्वर रक्त दाते संघटना व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.